मुंबई : मनसूख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेंना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एटीएसने या प्रकरणात काल म्हणजे सोमवारी सचिन वाझेंना प्रश्न विचारले. त्याचप्रमाणे सचिन वाझेंनी या प्रकरणाबाबत जबाब नोंदवला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षाने आरोप केले होते. वाझे आणि मनसूख घटनेपूर्वी एकमेकांना ओळखत होते अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी ATS ने काल सचिन वाझेंना बोलावलं होतं.
या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी वाझे काल दुपारी ATS अधिकाऱ्यांना भेटले होते. या संपूर्ण प्रकरणात ATS कडून वाझेंना काही प्रश्न विचारण्यात आल्याची सूत्रांची माहिती देण्यात आली आहे . वाझे आणि मनसुख घटनेपूर्वी पासून एकमेकांना कसे ओळखत होते याबाबत विचारणा केली जात आहे.
हिरेन मनसुखची गाडी चोरून संशयितांनी त्यात स्फोटक ठेवून ती कार अंबानी यांच्या घराबाहेर ठेवली होती. काही दिवसापूर्वी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बिल्डिंगसमोर जी बेवारस स्कॉर्पिओ आढळली होती, त्या स्कॉर्पिओ मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या मालकाची गाडी स्फोटकाने भरलेली स्कार्पिओ सापडण्याआधीच चोरीला गेली होती. मनसुख हिरेन हे या गाडीचे मालक होते. काल मुंब्रा इथल्या खाडीत त्यांचा मृतदेह सापडला.
मनसुख हिरेनप्रकरणात नवा खुलासा समोर येत आहे. आधी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मनसुख यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा व्रण नसल्याचं समोर आलेलं. मात्र आता विस्तृत आलेल्या शवविच्छेदन अहवालात मनसुख यांच्या शरीरावर काही खुणा असल्याचा उल्लेख आहे. पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही.