मुंबई पोलिसांना या ट्वीटमधून नेमकं काय सांगायचंय? पाहा व्हिडीओ

आपला पासवर्ड विसरु नये म्हणून 'बचपन का प्यार मेरा' म्हणत मुंबई पोलिसांकडून अनोखं ट्वीट

Updated: Jul 31, 2021, 06:44 PM IST
मुंबई पोलिसांना या ट्वीटमधून नेमकं काय सांगायचंय? पाहा व्हिडीओ

मुंबई: लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात ऑनलाइन सेवा आणि ट्रान्झाक्शन वाढले आहेत. त्यामुळे फसवणुकीचं प्रमाणही वाढलं आहे. हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि आपलं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आपला पासवर्ड आहे. हा पासवर्ड कोणाला सांगू नये असं वारंवार आवाहन करूनही बऱ्याचदा आपण फसतो. 

मुंबई पोलिसांची ट्विट्स नेहमीच हटके असतात. बचपन का प्यार गाण्याच्या व्हायरल व्हिडिओचा त्यांनी कल्पकतेनं वापर केला आहे. आपल्याला पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ऑनलाइन सुरक्षेसाठी जागरूक केलं. 

बचपन का प्यारची मीम्स शेअर केली आहे.तुमचे बालपणाचे प्रेम रहस्य होते का? मग तुमचा पासवर्ड अजूनही सुरक्षित असू शकतो. फक्त त्यात काही खास कॅरेक्टर जोडा, असं त्यात पोलिसांनी म्हटलं आहे. 

या चिमुकल्याच्या गाण्याचे बोल पोलिसांनी सुरक्षित पासवर्डसाठी वापरले आहेत. मुंबईकरांनो, एक 'प्रेमळ' आठवण करुन देतो आहे. आपला पासवर्ड विसरु नका! असं म्हणत मुंबई पोलिसांनी सतर्क राहण्याचं आणि आपला पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचं आवाहन केलं आहे.