दीपक भातुसे, मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरानाची लागण नसल्याचे स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांच्या बंगल्यावरील सर्व कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटरला कोरोना झाल्यानंतर ते क्वारंटाईन झाले होते. कोरानाची चाचणी केली असता त्यांनी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे मुंबईतील रॉयल स्टोन या सरकारी बंगल्यात राहत आहेत. याच बंगल्यात काम करणारा टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीची उपाय म्हणून थोरात हे होम क्वारंटाइन झाले होते.
राज्यात अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता वाढला आहे. दरम्यान थोरात यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.