बेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील

कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. 

Updated: Apr 7, 2020, 04:16 PM IST
बेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे. कोरोनाची लागण झालेली असताना बेस्ट वाहक ऑनड्युटी होता. त्यामुळे तो कोणत्या रुटवर गेला आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आता शोध मोहीम करावी लागणार आहे. दरम्यान,  तसेच संबंधित कंडक्टर आणि त्याच्यासोबत असणारे ड्रायव्हर यांना क्वारंटाईन केले आहे.

 बेस्ट कंडक्टरच्या जावयाला कोरोनाची लागण झाल्यानंतर परेल येथील बेस्ट कामगार वसाहतीमधील इमारत सील करण्यात आली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीची म्हणजेच कंडक्टरची विवाहित मुलगी माहेरी राहायला आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इमारत सील केली आहे आहे. तसेच संबंधित कंडक्टर आणि त्याच्यासोबत असणारा ड्रायव्हर यांना क्वारंटाईन केले आहे.

दरम्यान, कंडक्टरचा जावई हा विमानतळावर कामाला होता. त्याला पत्नी आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना झालेल्या बेस्ट कंडक्टरला रुग्णालात दाखल करण्यात आले आहे.