मुंबई : सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने तोडगा काढण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलं आहे.
नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत भैय्याजी जोशी बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी समग्र धोरण बनवण्याची गरज असून शेतकऱ्यांनीही काही बदल करण्याची गरज असल्याचे भैय्याजी जोशी यावेळी बोलले.
९० वर्षाच्या काळात संघ हा ६० हजार खेड्यात पोहचला हे संघाचे यश असल्याचेही भैय्याजी जोशी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत पोहोचला.
हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार आहेत.