राष्ट्रपती निवडणुकीसाठी भुजबळ जेलबाहेर येणार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या जेलमध्ये असलेले छगन भुजबळ यांनी केली होती. भुजबळांची ही मागणी पीएमएलए कोर्टानं स्वीकारली आहे. 

Updated: Jul 3, 2017, 05:24 PM IST
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भुजबळ जेलबाहेर येणार  title=

मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या जेलमध्ये असलेले छगन भुजबळ यांनी केली होती. भुजबळांची ही मागणी पीएमएलए कोर्टानं स्वीकारली आहे.

कोर्टानं दिलेल्या परवानगीमुळे तब्बल पावणे दोन वर्षांनी भुजबळ जेलबाहेर येणार आहेत. विधीमंडळामध्ये जाऊन छगन भुजबळ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करतील. १७ जुलैला राष्ट्रपती निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएनं रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर यूपीएनं मीरा कुमारी यांना उमेदवार घोषित केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मीरा कुमार यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला आहे.