Big Bazaar ची ग्राहकांसाठी खास ऑफर, २५०० मध्ये ३००० हजारांची खरेदी

 ग्राहकांना खरेदीसाठी मिळणार 3000 रुपयांचा सुपर सेव्हर व्हाउचर 

Updated: Jan 24, 2021, 08:19 PM IST
Big Bazaar ची ग्राहकांसाठी खास ऑफर, २५०० मध्ये ३००० हजारांची खरेदी

मुंबई : लोकांची सद्य आर्थिक स्थिती लक्षात घेऊन फ्यूचर ग्रुपने प्री-बुकिंग सुपर सेव्हर व्हाउचर (एसएसव्ही) योजना आणली आहे. ही योजना कंपनीच्या ओ 2 ओ (ऑनलाइन ते ऑफलाइन) उपक्रमांतर्गत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना  shop.bigbazaar.com वर 2500 रुपयांची ऑनलाईन प्रीपेमेंट करावी लागेल, त्यानंतर ग्राहकांना खरेदीसाठी 3000 रुपयांचा सुपर सेव्हर व्हाउचर मिळेल.

हे कूपन देशातील सर्व बिग बझार स्टोअर्स, बिग बाज़ार झोन नेक्स्ट किंवा हायपरसिटी स्टोअरमधून देखील घेता येतील. बिग बझार या सुपर सेव्हर व्हाउचर योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना “सर्वोत्कृष्ट 6 दिवस” दरम्यान 20 टक्के अतिरिक्त सूट देईल. हे "सर्वोत्तम 6 दिवस" ​​26 ते 31 जानेवारी दरम्यान आहेत.

प्री-बुकिंग सुपर सेव्हर व्हाउचर देण्याचा कालावधी 10 जानेवारी 2021 ते 25 जानेवारी 2021 दरम्यान आहे. त्यानंतर या व्हाउचरची पूर्तता 23 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान करता येते. बिग बझारच्या वेबसाइट / अ‍ॅप किंवा पार्टनर वेबसाइट / अ‍ॅप्सवरूनही ग्राहक हे सुपर सेव्हर व्हाउचर खरेदी करू शकतात.

या योजनेत, 2500 रुपये भरल्यावर ग्राहकाला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 1000 रुपये किंमतीचे तीन ई-व्हाउचर मिळतील. ज्याचे एकूण मूल्य 3000 रुपये असेल. बिग बाजार, एफबीबी, फूड बाजार आणि हायपरसिटी स्टोअरमध्ये या व्हाउचरचा वापर करता येईल.

व्हाउचर देताना आपण दिलेला मोबाईल नंबर योग्य आणि सक्रिय आहे हे ग्राहकांनी लक्षात ठेवले पाहिजे कारण हे व्हाउचर फक्त त्या मोबाईल नंबरवरच मिळू शकतात. कंपनीने असे म्हटले आहे की, एकदा हे व्हाउचर खरेदी झाल्यानंतर ते परत मिळणार नाहीत.

प्रत्येक ई-व्हाउचरची संपूर्ण पूर्तता केली पाहिजे. ई-व्हाउचर्सची अंशतः पूर्तता केली जाणार नाही. या ई-व्हाउचर्सना रोख रीडीम देखील करता येणार नाही.

कंपनीच्या निर्णयानुसार हे वाउचर तेल, तूप, साखर, बाळ आहार, सिगारेट, मोबाईल आणि इतर वस्तूंच्या खरेदीवर वैध असणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार या ऑफरमध्ये इतर कोणत्याही ऑफरचा समावेश होणार नाही.