केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्यातील जनतेला मिळणार दिलासा

Updated: Nov 4, 2021, 11:33 AM IST
केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय  title=

मुंबई : केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र त्यासोबत राज्यात पेट्रोल 6.25 रूपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या करात कपात करण्याचा विचार नाही. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर अनेक भाजप शासित राज्यांनी आपल्या करात कपात केली आहे. मात्र राज्य सरकारचा सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या करात कपात करण्याचा विचार नाही. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राज्य सरकारमध्ये देखील या विषयी चर्चा करण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी नकारात्मक भूमिका घेतली. कारण कोरोनामुळे राज्यचं उत्पन्न घटलं आहे. अशात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली, व्हॅट कमी केला तर राज्याचं उत्पन्न घटेल, राज्याला सर्वात जास्त उत्पन्न दारूच्या उत्पादन शुल्कातून आणि पेट्रोल-डिझेलवर लावल्या जाणाऱ्या व्हॅटमुळे होतं.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या करात कपात करण्याचा विचार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या करात जो दिलासा दिलासा तोच राज्याला दिला जाईल. आसा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीतून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्यूटी कमी केली आहे. यामुळे पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त होणार आहे.

देशात गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115 वर तर दिल्लीत पेट्रोल 107.94 इतकं आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव 106.62 रुपयांवर तर दिल्लीत डिझेल 98.42 रुपये इतकं आहे.