VIDEO! दहिसरमध्ये स्टेट बँकेत फायरिंग, एका व्यक्तीचा मृत्यू

आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत दिवसाढवळ्या दरोडा

Updated: Dec 29, 2021, 05:39 PM IST
VIDEO! दहिसरमध्ये स्टेट बँकेत फायरिंग, एका व्यक्तीचा मृत्यू title=

मुंबई : मुंबईत दिवसाढवळ्या दरोड्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतल्या दहिसर पश्चिम इथल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचमध्ये  गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  (Firing in dahisar state bank one dead )

गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती असून एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे. गोळीबारात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव संदेश गोमारे असून तो 25 वर्षांचा आहे. 

दरोडेखोर 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाले आहे. पोलिसांच्या 8 टीम आरोपीसचा शोध घेत आहेत.