मुंबई : अकरावीला प्रवेश घेण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी 30 मे पासून ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरू होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या ओंलीने नोंदणीचा पहिला टप्पा 30 मे पासून सुरू होणार आहे.
३० मे पासून अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्यांना नोंदणी सुरू करता येणार आहे. तर, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा भरता येणार आहे. 10 वी च्या निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या तसेच शैक्षणिक वर्ष 22 - 23 साठी अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्वाची असणार आहे.
महाराष्ट्रातील निवडक शहरांमधील ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या पसंतीच्या महाविद्यालयांची प्राधान्यक्रम यादी द्यावी लागणार आहे. यानुसार किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्याल्यांची नवे देता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात मेरिट लिस्टनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास हेल्प लाइन नंबरवर कॉल करून आपली अडचण सोडवता येणार आहे. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करून आवडते महाविद्यालय निवडू शकतात.