मुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपलं

 मुंबईसह उपनगरांना पावसानं रात्री चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं मुंबईतील घाटकोपर, चेंबुर आणि कुर्ल्यातील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं पाठ फिरवली होती. मात्र काल अचानक झालेल्या पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

Updated: Jun 15, 2017, 09:47 AM IST
मुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपलं title=

मुंबई : मुंबईसह उपनगरांना पावसानं रात्री चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं मुंबईतील घाटकोपर, चेंबुर आणि कुर्ल्यातील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं पाठ फिरवली होती. मात्र काल अचानक झालेल्या पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

कल्याण, डोंबिवलीमध्ये ही रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह काही तास जोरदार पाऊस झाला.