पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न- प्रवीण दरेकर

 झी २४ तासनं हे प्रकरण उजेडात आणत त्याचा पाठपुरावा केला होता.

Updated: Oct 1, 2020, 01:08 PM IST
पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न- प्रवीण दरेकर title=

मुंबई : मुंबई बॅंक तोटा प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारचा अहंकार यात जागा झालाय. यामध्ये शासन देणेकरी असल्याचे दरेकर म्हणाले. काही कमी जास्त गोष्टी असतील ते सहकार खात सांगत असतं. सहा मुद्द्यांची तपासणी लावली आहे हे खर असल्याचं ते म्हणाले. अनेक मुद्दे घेऊन मी विरोधी पक्षनेता म्ह्णून समोर येतोय. प्रश्न मांडतोय म्हणून पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न आहे. मी घाबरत नाही असे दरेकर म्हणाले. 

अकाऊंट एनपीएमध्ये गेली होती त्यामुळे तोटा होता मात्र आता सर्वांनी मेहनत घेऊन आता बँक नफ्यात आलीये.ज्यांच्या विश्वासावर बँक मोठी झाली त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे. खरं म्हणजे ही रुटीन तपासणी असल्याच ते म्हणाले. साखर कारखान्यांना दिलेले कर्ज कॉर्पोरेट लोन आहे. या लोन मुळे बँकेचा फायदा झालाय,  एखादं दुसरं लोन थकलं असलं तरी सिक्युरिटी घेतलेली आहे. CBS प्रणाली बँकेत आहे. त्यामुळे तपशीलवार माहिती दिली जाईल. तपासणी करा काही हरकत नसल्याचे ते म्हणाले. 

सेल्फ डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी मिळणार आहे. सहाही मुद्द्यांमध्ये आरोप करण्याचं काहीही तथ्य नाही. तपशीलवार माहिती दिली जाईल असे ते म्हणाले. संस्था उभी करणं आणि चालवणं अवघड असतं. या बँकेतून आम्ही शेतकरी हौसिंग सेक्टर ला आधार देण्याचा प्रयत्न केल्याचे दरेकर म्हणाले. 

मराठा तरुणाच्या आत्महत्येवर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  जर मराठा तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला तर सरकारला आवरता येणार नाही.आरक्षण मुद्द्यावर जे जे शक्य आहे ते सरकारने करावं आश्वस्त करावं.उद्या जर याचं रूपांतर ठोक मोर्चात झालं तर ते आवरणं कठीण होईल असा इशारा दरेकरांनी यावेळी दिला. 

हाथरस प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. हाथरस असो किंवा कुठल्याही राज्यात आशा घटनांना पाठीशी घालण्याचा संबंध नाही. दुसऱ्या राज्यात झालेल्या घटनेचा बाऊ करत आहेत. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून अशी गत आहे. महाराष्ट्रातसुद्धा घटना घडत आहेत मात्र त्यावर सरकार शांत आहे. आणि दुसऱ्या राज्यातील घटनांवर भाष्य करत असल्याचे दरेकर म्हणाले. 

मुंबई बँकेतल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे सहकार विभागानं आदेश दिलेत. चौकशीसाठी सहकार विभागातल्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. बँकेला झालेल्या ४८ कोटी रुपयांचा तोटा, बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेलं कर्ज, बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची चौकशी, गृहनिर्माण संस्थांना स्वयंपूर्नविकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची चौकशी, बँकेचे मुख्यालय आणि शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च या सगळ्याची चौकशी होणार आहे. भांडवलात घट होऊन ते ७.११ टक्के कसे झालं.

यापूर्वीही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर संचालक मंडळाविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. खातेदारांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचाही आरोप करण्या आला होता.

तर नाबार्डनेही मुंबई बँकेच्या कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता, झी २४ तासनं हे प्रकरण उजेडात आणत त्याचा पाठपुरावा केला होता.