मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नाही. पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहेत. तर शिवसेनेला मुख्यमंत्री आणि महत्त्वाची पदं देण्यास भाजपा राजी नाही आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचं घोड अडलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा प्रश्न आ वासून उभा आहे. या सर्व पार्श्वभुमीवर भाजपा नेत्यांची महत्त्वाची आज दुपारी वर्षा बंगल्यावर होणार आहे. या बैठकीत कोणत्या गोष्टींवर चर्चा होणार ? काय निर्णय होणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राजकारण नव्हे तर ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा असल्याची माहीती भाजपातील नेत्यांनी दिली आहे. राज्यातील आताची परिस्थिती नेमकी काय ? नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई कशाप्रकारे देता येईल यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज तेराव्या दिवशी तरी युतीतील चर्चा सुरू होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर जाण्याचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शरद पवार आज मुंबईत येणार आहेत. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर पुन्हा दोन दिवसांमध्ये ते पुन्हा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. िवसेनेबरोबर सत्तेत जाण्याचा पर्याय खुला असल्यानेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांच्या पुढील खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.