भाजप पराभूत उमेदवारांचा आरोप, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे अपयश

अपयशाचे खापर पराभूत उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर फोडले आहे.  

Updated: Dec 27, 2019, 07:50 PM IST
भाजप पराभूत उमेदवारांचा आरोप, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे अपयश title=
संग्रहित छाया

मुंबई : विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपला आलेल्या अपयशाचे खापर पराभूत उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर फोडले आहे. या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, विखे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटत नाही की माझ्यावर राग असले. पक्ष संघटना काय तो निर्णय घेईल, मी काय याबाबत बोलणार, असे विखे पाटील म्हणालेत.

अहमदनगरमधील भाजपमधील संघर्ष मिटविण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नगरबाबत बैठक बोलवली आहे. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, शिवाजीराव कर्डीले उपस्थित आहेत. मुंबईतील प्रदेश भाजपच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे. नगरमधील १२ पैकी केवळ तीन जागा भाजपाला जिंकता आल्या. यात मंत्री राम शिंदे, शिवाजीराव कर्डीले यांचाही पराभव झाला होता. विखे आणि पिचडांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या सातवर गेली होती.

दरम्यान, राम शिंदे याबाबत भूमिका मांडतील. बैठकीमध्ये चर्चा झाली पक्षांतर्गत वादासंदर्भात माजी पालकमंत्री राम शिंदे बोलतील. प्रत्येक पक्षात ही नाराजी असते. या पक्षातही आहे. खासदार सुजय विखे यांनी जे वक्तव्य केले होते, ते मला माहित नाही. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरायचा आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांची बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

भाजप नेत्यांनी नाराजी माध्यमांऐवजी पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया  विखे-पाटील यांनी दिली आहे. विखे पितापुत्रांवर निवडणुकीत पाडापाडी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काही नेत्यांनी विखे पक्षात आल्याने पक्षाला त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे म्हटले आहे. तर राम शिंदे यांनी थेट विखे-पाटील यांच्यावर आरोप केला आहे.