मुंबई : विरोधी पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आणि मुंबईच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या टीकेचे विषय झाले आहेत. एलफिन्स्टन दूर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओच त्यांच्यावरील टीकेचे कारण ठरला आहे.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत पुष्ठी झालेली नाही. मात्र, ज्या दिवशी सकाळी एलफिन्स्टन दूर्घटना घडली त्याच रात्रीचा हा व्हिडिओ असल्याचे सोशल मीडियातून सांगितले जात आहे. एलफिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला २४ तासही उलटले नाहीत तोवर जबाबदार लोकप्रतिनीधी म्हणवून घेणारे सोमय्या हे गरबा खेळण्यात व्यग्र झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
एलफिस्टन येथील चेंगराचेंगरीत दुर्दैवाने 23 जण दुर्दैवी मृत्यू झाले असताना भाजपा खासदार किरीट सोमय्या भांडुप मध्ये दांडिया खेळात मग्न होते pic.twitter.com/Gl9WkV4xZV
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 30, 2017
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा फोटो ट्विट करून निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरूनही सोमय्या यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.