Andheri East Assembly Constituency : भाजप अंधेरी पूर्वेतील रिक्त विधानसभेची जागा लढवणार, सूत्रांची माहिती

भाजप अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची (Andheri East Assembly Constituency) जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Updated: May 27, 2022, 06:33 PM IST
Andheri East Assembly Constituency : भाजप अंधेरी पूर्वेतील रिक्त विधानसभेची जागा लढवणार, सूत्रांची माहिती title=

मुंबई :  भाजप अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची (Andheri East Assembly Constituency) जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Shiv Sena Ramesh Latke)  यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता या जागेसाठी भाजप सज्ज असल्याचं समजत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Debvendra Fadnvis) यांनी भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्याकडून मतदारसंघाचा आढावाही घेतला आहे. (bjp murji patel may contestant in andheri east assembely constituency who vacant due to mla ramesh latke death)

शिवसेना आमदार रमेश लटके यांचं 12 मे ला दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. त्यामुळे आता लवकरच या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. भाजप या मतदारसंघातून  पटेल यांना उमेदवारी देऊ शकते, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 

मुरजी पटेल यांच्याबाबत थोडक्यात (Who is Murji Patel)

पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. पटेल 2019 मध्ये रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती.

पटेल 'जीवन ज्योत प्रतिष्ठाण' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे.  त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं दिसून येतंय.