मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

शिवसेना भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील

Updated: Jun 16, 2021, 05:42 PM IST
मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

मेघा कुचिक, झी २४ तास, मुंबई : शिवसेना भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं, यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. कारण शिवसेनेच्या कार्यकर्तेदेखील शिवसेनाभवन बाहेर प्रत्युत्तर देण्यासाठी जमा झाले होते, भाजपा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच भाजपा आंदोलक होते. मात्र भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

- राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपाचं आंदोलने 
- शिवसेनाभवनबाहेर भाजपा युवा मोर्चा मुंबईतर्फे आंदोलन
- भाजपाचा शिवसेनाभवनबाहेर फटकार मोर्चा
- शिवसेनेच्या कार्यकर्तेदेखील शिवसेनाभवन बाहेर प्रत्युत्तर देण्यासाठी गर्दी
- शिवसेनाभवनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
- सेना आमदार सदा सरवणकर आणि कार्यकर्त्यांचीही गर्दी

भाजपा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच भाजपा आंदोलक होते.