close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'

 भाजपाच्या विस्तारित कार्यकारिणीची आज बैठक सुरू झालीय.

Updated: Jul 21, 2019, 12:54 PM IST
'राज्यात 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा'

मुंबई : 288 जागांवर भाजपाच्या जागा येतील अशी तयारी करा,आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जागा वाटप,युती या बद्दल देवेंद्रजी योग्य ते निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा, एकनाथ खडसे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित आहेत. 

गेल्या पाच वर्षात 50 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेच महत्वाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यामुळेच 2014 जिंकलो आता लोकसभा जिंकलो आणि विधानसभाही जिंकणार असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

ईव्हीएममध्ये घोटाळा तर मग बारामती कशी जिंकली ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा असा टोलाही त्यांनी लगावला. वंचितमुळे काँग्रेसला फटका आणि भाजपाला फायदा झाला असे म्हणता येणार नाही. वंचितबिंचित काही नाही आपला विजय बूथ रचना आणि पन्ना प्रमुखांमुळे झाल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेसचा बरमोडा झाला आहे अशी बोचरी टीका भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. चंद्रकांत दादा यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी हाती दिला आहे. या झेंडयाचा मजबूत दांडाही दिला आहे. चंद्रकांत दादांचा अनुभव दांडगा आहे ते पक्ष आणखी वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजपा असून काँग्रेसचा बरमोडा झाला आहे अशी बोचरी टीका भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. चंद्रकांत दादा यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी हाती दिला आहे. या झेंडयाचा मजबूत दांडाही दिला आहे. चंद्रकांत दादांचा अनुभव दांडगा आहे ते पक्ष आणखी वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजपा असून गरिबांनी काँग्रेसला हटवला आणि गरिबांचा पंतप्रधान नेमल्याचे ते म्हणाले.