भाजपकडून मनधरणी सुरूच, शिवसेना मात्र ठाम

शिवसेनेने आपल्या भूमिकेवरुन माघार घ्यावी, यासाठी भाजपनं शिवसेनेची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2018, 12:28 PM IST
भाजपकडून मनधरणी सुरूच, शिवसेना मात्र ठाम title=

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिल्यानं भाजपनं याची गंभीर दखल घेतली आहे. शिवसेनेने आपल्या भूमिकेवरुन माघार घ्यावी, यासाठी भाजपनं शिवसेनेची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेसाठी भाजपचा आतापासून प्रस्ताव

येत्या विधानसभेत २८८ जागांपैकी १४० जागा देऊ असा प्रस्ताव, भाजपनं शिवसेनेसमोर ठेवला आहे. या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या मनातील कडवटपणा काहीसा कमी होऊ शकतो, असा भाजपचा अंदाज आहे.

शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदारांसोबत चर्चा

या संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदारांसोबत चर्चा केली. सोबत लढलो नाही तर दोघांचंही नुकसान होईल, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.