भाजपमध्ये ओबीसींचं खच्चीकरण - प्रकाश शेंडगेंचा आरोप

भाजपमध्ये ओबीसींचं खच्चीकरण सुरू आहे. त्यामुळे ओबीसींचा

Updated: Dec 10, 2019, 06:04 PM IST
भाजपमध्ये ओबीसींचं खच्चीकरण - प्रकाश शेंडगेंचा आरोप

मुंबई : भाजपमध्ये ओबीसींचं खच्चीकरण सुरू आहे. त्यामुळे ओबीसींचा नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलीय. सर्व ओबीसी बाहेर पडले तर भाजप २-४ आमदारांपुरता मर्यादीत राहणार असा टोलाही त्यांनी लगावलाय. 

गोपीनाथ मुंडेंचा सर्वात जास्त छळ भाजपतल्या नेत्यांनीच केल्याचा आरोप शेंडगेंनी केलाय. खडसे आणि पंकजा मुंडेंनाही वारंवार अपमानित करून डावलण्यात आल्याचा आरोपही शेंडगेंनी केलाय. 

झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या आरोपांना प्रकाश शेंडगेंनी उत्तर दिलं आहे.