राज्यात भाजप विरूद्ध कॉंग्रेस संघर्ष पेटला; पोलिसांनीही फौजफाटा वाढवला

महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत, त्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज काँग्रेस आंदोलन करणार आहे.

Updated: Feb 14, 2022, 09:31 AM IST
राज्यात भाजप विरूद्ध कॉंग्रेस संघर्ष पेटला; पोलिसांनीही फौजफाटा वाढवला title=

मुंबई : महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत, त्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज काँग्रेस आंदोलन करणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसा इशारा दिलाय. तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केल्यास जशास तसं उत्तर देऊ, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सायन सर्कल इथं बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय. 

भाजपचे सर्व मुंबईतील आमदार सागर बंगल्यावर येणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिलीय. तसंच आंदोलन करू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांचे फोन येत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.