BMC Budget News : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. (BMC Budget 2023) त्यांनी 52619.07 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. (Mumbai Municipal Corporation Budget 2023) पालिकेच्या इतिहासात प्रथमच 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा बजेटने ओलांडला आहे. ( BMC Budget In Marathi ) दरम्यान, 14.50 टक्के अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. ( BMC Budget ) गेल्या 5 वर्षाशी तुलना केली आता 52 ट्क्के कॅपिटल म्हणजे विकासवर खर्च होणार 48 टक्के इतर गोष्टींवर खर्च होणार आहे. विकास कामांवर प्रथमच 50 टक्के अधिक खर्च केला जाईल. मात्र, विकास कामे करण्यासाठी ठेवीतून पैसे काढले जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या 88 हजार कोटी रुपपयांच्या ठेवी असून त्यातील यंदाच्या बजेटसाठी 12776 कोटी रुपये काढले जाणार आहेत, अशी माहिती चहल यांनी दिली. ( Mumbai News)
BMC Budget : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी कोणतीही करवाढ नाही
आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च 6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12 टक्के इतका आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पारदर्शकता यावर बजेटमध्ये भर दिला आहे. एकूण बजेटच्या 12 टक्के आरोग्याला दिले आहेत, यावर्षी 6300 कोटी आरोग्याला दिले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांनी काही सूचना केल्या होत्या. वायू प्रदूषण इतर काही मुद्द्यांवर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तरतूद केल्याचे चहल यांनी सांगितले.
BMC Budget 2023 Updates : मुंबई पालिकेचे 52619 कोटींचे बजेट, 'यासाठी' विशेष तरतूद
तसेच मार्चपर्यंत मागील बजेटचे टार्गेट पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जवळपास 9 हजार जकात मागील वर्षी मिळाले आहे. पावणेतीनशे कोटी अधिक FD वर मिळत आहेत. मागील वर्षी प्रॉपर्टी टॅक्स 7 हजार कोटी टार्गेट होते, यावेळी 5200 कोटी टार्गेट ठेवले आहे. हे दोन पालिकेचे प्रमुख income source आहेत आहेत. नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या, 965 लोकांनी सूचना पाठवल्या होत्या. एका नागरिकाची सूचना होती, त्यावरुन हे धोरण जाहीर करण्यात आले असून 9 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रस्ता रुंद असेल तर त्या रस्त्यावर फुटपाथ असेल, असे ते म्हणाले.
आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागाचा 3 हजार 347.13 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
- खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद
- व्हरच्युल क्लासरूमसाठी 3. 20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- महापालिका शाळांतील प्रशिक्षणे आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- 2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद
- याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे
- आर्थिक वर्ष 2023 - 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत.
- नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28 . 45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
- निवडक शाळांतील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.