दीपक भातुसे, मुंबई : MPSC प्रमाणे मुंबई महापालिकेतर्फे खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या पदांसाठी मुंबई महापालिकेच्या खांत्यांतर्गत परीक्षा होणार आहेत. 16 ते 18 एप्रिल रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता होत आहे. परीक्षा देणारे अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळेही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारने मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच अनेक महत्त्वाच्या परीक्षा रखडल्या आहेत. आज सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 9 आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यासा निर्णय घेण्यात आला होता. त्यातच आता या परीक्षांवर देखील कोरोनाचं सावट असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे.