मुंबई : अभिनेता अक्षय कुमारा बृहमुंबई महानगरपालिकेने ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेणार आहे. ओडीएफ म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री कॅम्पेनसाठी बीएमसी अक्षयला ब्रँड अॅम्बेसडर बनवणार आहे.
बीएमसीने सलमान खानला याआधी ब्रँड अॅम्बेसडर बनवलं होतं. या कॅम्पेननुसार अक्षय मुंबईत उघड्यावर शौच न करण्याचं आवाहन अक्षय कुमार करणार आहे. अक्षयसाठी बीएमसी मार्शलचा ड्रेस देखील तयार करत असल्याचं बोललं जातंय.