सफाई कामगार ठरतोय तरूणांचं प्रेरणास्थान, वयाच्या पन्नाशीत मिळवलं घवघवीत यश

राज्यातील दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. 

Updated: Jun 19, 2022, 02:26 PM IST
सफाई कामगार ठरतोय तरूणांचं प्रेरणास्थान, वयाच्या पन्नाशीत मिळवलं घवघवीत यश  title=

मुंबई : राज्यातील दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी पास होऊन घवघवीत यश मिळवलं. या सर्व निकालात आता एका स्वच्छता कर्मचाऱ्याची खुप चर्चा रंगली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी घवघवीत यश मिळवले आहे. त्याने हे यश कस संपादन केलं ते जाणून घेऊयात.  

तूम्हाला कुठलीही गोष्ट साध्य करायची आहे, तर त्यासाठी तूमच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम असणे गरजेचे आहे. कारण याच बळावर BMC च्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने वयाच्या 50 व्या वर्षी दहावीची परीक्षा पास करून दाखवली.  

कोण आहे हा स्वच्छता कर्मचारी?
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. बीएमसीच्या विविध विभागांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. कुंचीकोर्वे मशन्ना रामाप्पा वय 50, हे बीएमसीमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. रामाप्पा बीएमसीच्या स्वच्छता विभागाच्या बी वॉर्डमध्ये काम करतात. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ ते हे काम करत आहे. स्वच्छता कर्मचारी रामाप्पा दिवसभर बीएमसीमधील साफसफाईचे काम उरकून इतर कामांना वेळ द्यायचे.

अभ्यास कधी करायचे? 
रामाप्पा दिवसभराचे काम आटोपून रोज संध्याकाळी सात ते साडेआठ या वेळेत शाळेत जात असे.धारावीच्या युनिव्हर्सल नाईट स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. ड्युटी आटोपून घरी आल्यावर रामाप्पा रोज अभ्यास करत. यामध्ये त्यांचे कुटुंब, मुले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली.

किती टक्के मिळाले?
रामाप्पा यांनी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करताना त्यांची स्वप्ने केवळ जिवंत ठेवली नाहीत तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला. शेवटी वयाच्या 50 व्या वर्षी ते 10वी बोर्डाच्या परीक्षेत बसले आणि पहिल्याच प्रयत्नात 57% गुणांसह उत्तीर्ण झाला. 

तसेच हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रामप्पा यांना आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. तो म्हणतो की त्याला लहानपणी अभ्यास करता आला नाही, पण आता दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे.