मुंबईत या रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन, बॉम्बस्कॉड पथकाकडून कसून तपास

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल  (Threat Call) आला आणि एकच धावपळ उडाली.  

Updated: Aug 7, 2021, 10:08 AM IST
मुंबईत या रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन, बॉम्बस्कॉड पथकाकडून कसून तपास title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल  (Threat Call) आला आणि एकच धावपळ उडाली. तात्काळ घटनास्थळी बॉम्ब स्कॉड पथकाकडून कसून तपास करण्यात आला. त्याचवेळी मोठा पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्यात आला. मात्र, ही एक अफवा असल्याचे पुढे आले. (Threat Call about bomb at CSMT station in Mumbai )

सीएसएमटी स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल आल्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या शोधपथकाकडून  3 ते 4 तास शोध घेत तपास करण्यात आला. मात्र, या तपासात काहीही आढळले नाही. बॉम्ब स्क्वॉडकडून क्लिअरन्स आल्यानंतर तेथील बंदोबस्तात काही प्रमाणात शिथिलता आणली गेली. ही बॉम्बची अफवाच होती, असे पोलिसांकडून सांगण्यातआले. दरम्यान, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. 

मुंबई पोलिसांपुढे एका निनावी फोनमुळे मोठा गोंधळ उडाळा आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. रात्री 8 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास 100 नंबरवर बॉम्ब ठेवल्याबाबतचा फोन आला. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले आणि पोलीस सावध झालेत. 

गांभीर्य लक्षात घेत ज्या नंबरवरून हा कॉल आला होता. त्या नंबरवर पोलिसांनी लगेचच संपर्क साधला, तेव्हा माझ्याकडे असलेली माहिती मी तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करू नका, इतकंच सांगून त्या व्यक्तीने फोन ठेऊन दिला. त्यानंतर पोलिसांची डोकेदुखी वाढली. तपास तर करावा लागणार होता. तात्काळ घटनास्थळी बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल झाले आणि बंदोबस्त वाढविण्यात आला. मात्र, तिथे  बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला काहीही सापडलेले नाही. ती एक अफवा होती, असे पोलिसांकडून सांगण्यात  आले.