bulli bai app बुल्लीबाई ऍप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या ऍपचे संचालन एक 19 वर्षीय तरुणीच करीत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे.
मुंबई : बुल्लीबाई ऍप प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात अनेक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय श्वेता सिंह या तरुणीला उत्तराखंड येथून ताब्यात घेतले आहे. तरुणीला मुंबईत आणण्यात येणार आहे. ही तरुणी याप्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.
श्वेताच्या चौकशीनंतर अनेक बाबी स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याच प्रकरणातील चौकशीतून विशाल कुमार या अभियांत्याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. त्यालाही मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, विशाल आणि श्वेता एकमेकांच्या संपरक्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुल्लीबाई या ऍपवर श्वेताने मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड केल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती आहेत.
श्वेता रुद्रपूरची (उत्तराखंड) राहणारी आहे. बारावी उत्तीर्ण श्वेताचे पुढील शिक्षण सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
बुल्लीबाई या ऍपच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंवर बोली लावली जात होती. हा धक्कादायक प्रकार एका महिला पत्रकाराने तक्रार केल्यानंतर उघडकीस आला. हे ऍप ब्लॉक करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.