ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; 'या' ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ

ठाकरे मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा...

Updated: Dec 30, 2019, 03:13 PM IST
ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; 'या' ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ title=

मुंबई : महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. मंत्रिमंडळातील ३६ जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शपथविधी सोहळ्यात २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. शपथविधीसाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती, मात्र विरोधकांची शपथविधीसाठी अनुपस्थिती होती. 

- संदिपान पाटील भुमरे, शिवसेना, कॅबिनेट मंत्रिपद - पैठण आमदार

- राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार, राज्यमंत्रिपदाची शपथ - शिरोळचे अपक्ष आमदार

- दादा भुसे, शिवसेना - मालेगाव ग्रामीण आमदार 

- दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी - आमदार, आंबेगाव

- अनिल देशमुख, राष्ट्रवादी - काटोल मतदारसंघातून विजयी 

- प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी, राज्यमंत्रिपदाची शपथ - राहुरी विधानसभा आमदार

- संजय बनसोडे, राष्ट्रवादी, राज्यमंत्रिपदाची शपथ - उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार

- आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, राज्यमंत्रिपदाची शपथ  - रोह्यातील वरसे जिल्हापरिषद मतदारसंघातून विजयी

- दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी, राज्यमंत्रिपदाची शपथ - इंदापूर विधानसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजयी

- विश्वजीत कदम, काँग्रेस, राज्यमंत्रिपदाची शपथ - पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार

- बच्चू कडू, अपक्ष आमदार, राज्यमंत्रिपदाची शपथ - अमरावतीच्या अचलपूरमधून सलग चौथ्यांदा विजयी 

- सतेज पाटील, राष्ट्रवादी, राज्यमंत्रिपदाची शपथ - कोल्हापूर विधानपरिषदेचे आमदार

- शंभुराज देसाई, शिवसेना, राज्यमंत्रिपदाची शपथ - पाटण मतदारसंघाचे आमदार

- आदित्य ठाकरे, शिवसेना, कॅबिनेट मंत्रिपद - वरळी मतदारसंघातून विजयी

- अस्लम शेख, काँग्रेस - मालाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार 

- शंकरराव गडाख, अपक्ष आमदार, कॅबिनेट मंत्रिपद - अहमदनगरमधील नेवासामधून विजयी, क्रांती शेतकरी पक्षाचे अध्यक्ष

- के. सी पाडवी, काँग्रेस - अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी, सलग सातवेळा आमदारपदी विजयी

- उदय सामंत, शिवसेना - रत्नागिरी मतदारसंघातून विजयी, २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश

- अनिल परब, शिवसेना - शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार

- यशोमती ठाकूर, काँग्रेस, कॅबिनेट मंत्रिपद - तिवसा मतदारसंघातून विजयी, सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवड

- बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, कॅबिनेट मंत्रिपद - सातारा कराड उत्तर विधानसभा आमदार, २००४ ते २०१९ राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ५ वेळा निवड

- अमित देशमुख, काँग्रेस, कॅबिनेट मंत्रिपद - लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी, सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक

- गुलाबराव पाटील, शिवसेना, कॅबिनेट मंत्रिपद - खान्देशातलं शिवसेनेचं नेतृत्व, शिवसेनेचा ग्रामीण भागातील चेहरा, जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेकडून विजयी

- संजय राठोड, शिवसेना, कॅबिनेट मंत्रिपद - दिग्रस मतदारसंघ आमदार, २०१४ ते २०१९ महसूल राज्यमंत्री 

- सुनिल केदार, काँग्रेस, कॅबिनेट मंत्रिपद - सावनेर मतदार संघातून विजयी

- राजेश टोपे, राष्ट्रवादी, कॅबिनेट मंत्रिपद - घनसावंगी मतदार संघाचे आमदार

- नवाब मलिक, राष्ट्रवादी, कॅबिनेट मंत्रिपद - अणुशक्तीनगर मतदारसंघातून विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष

- डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी, कॅबिनेट मंत्रिपद - २०१४ चा अपवाद वगळता १९९५ पासून आमदार, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार
- वर्षा गायकवाड, काँग्रेस - सलग चौथ्यांदा धारावीतून विजयी
- हसन मुश्रीफ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी - कळवा-मुंब्रा आमदार

- अब्दुल सत्तार, शिवसेना - राज्यमंत्रिपदाची शपथ

- धनंजय मुंडे - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

 

- अशोक चव्हाण, काँग्रेस - कॅबिनेट मंत्रिपद 

- विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी - कॅबिनेट मंत्रिपद 

- राष्ट्रवादी - दिलीप वळसे पाटील - कॅबिनेट मंत्री
- अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून सात मंत्रीच राज्याचा कारभार पाहत आहेत. मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये शिवसेनेच्या १२ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ मंत्री,  तर काँग्रेसच्या १० मंत्र्यांनी आज शपथ घेतली.