मंत्रिमंडळात पाहा कोणाला कोणतं खातं?

मंत्रिमंडळ विस्तार...

Updated: Dec 30, 2019, 03:53 PM IST
मंत्रिमंडळात पाहा कोणाला कोणतं खातं? title=
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकास आघाडीचा पहिला विस्तार झाल्यानंतर आता कुणाला कोणतं खात मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पक्षाकडून आपापल्या खात्यांची आणि नेत्यांची निवड पूर्ण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं महत्त्वाचं गृहखातं अनिल देशमुखांना बहाल केलंय... तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं सोपवण्यात येणार आहे. जयंत पाटलांकडे जलसंपदा खातं देण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय खातं देण्यात येणार आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रिपद सोपवण्यात येणार आहे. नवाब मलिक यांना उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय अशी दोन खाती सोपवण्यात येणार आहेत. 

अधिक वाचा : शपथ देताना राज्यपाल का म्हणाले, 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?'

अधिक वाचा : ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; 'या' ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ

दरम्यान, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या यादीवर अजित पवारांचं वर्चस्व दिसून आलं. मात्र सर्व विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अजित पवारांनी केलाय.

  

दरम्यान, ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यात महाविकास आघाडीच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यात शिवसेनेच्या ८ जणांनी कॅबिनेट तर चार जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ जणांनी शपथ घेतली. यात १० कॅबिनेट आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेच्या आठ जणांनी कबिनेट आणि दोन जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळेंसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. मात्र या शपथविधी सोहळ्याला योग्य पद्धतीनं निमंत्रण न दिल्यामुळे विरोधकांनी पाठ फिरवली. तसंच छोट्या मित्रपक्षांना निमंत्रण न दिल्यामुळे त्यांचीही अनुपस्थिती जाणवली.