शिवस्मारकाच्या कामावर कॅगचे ताशेरे, अशोक चव्हाणांकडून चौकशीची घोषणा

शिवरायांच्या सागरी स्मारकातील कामांच्या निविदा प्रक्रियेवर कॅगनं गंभीर आक्षेप घेतले आहेत.

Updated: Mar 4, 2020, 10:14 PM IST
शिवस्मारकाच्या कामावर कॅगचे ताशेरे, अशोक चव्हाणांकडून चौकशीची घोषणा title=

मुंबई : शिवरायांच्या सागरी स्मारकातील कामांच्या निविदा प्रक्रियेवर कॅगनं गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे या आक्षेपांची सरकारं गंभीर दखल घेतली असून या कामांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली आहे.

ही अनियमितता ५०० ते १ एक हजार कोटीच्या घरात असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर या निविदा प्रक्रियेबाबत केंद्रातल्या कॅगनंही आक्षेप घेतलेले असल्याचा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला गेला.

हा व्यवहार कंत्राटदार कंपनीच्या फायद्यासाठी पुनर्निविदा न मागविता केला असल्याचा लेखी आक्षेप नोंदवला असल्याचं डिसेंबर, २०१९मध्ये निदर्शनास आल्याचाही सवाल केला. त्यावर हे देखील अंशत: खरं असल्याचं चव्हाणांनी सांगितंल. तर शिवस्मारक समितीचे माजी अध्यक्ष विनायक मेटेंनी सर्व खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला.