मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही

Sion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 20, 2024, 07:15 AM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही title=
Central Railway proposes restriction of heavy vehicles on Sion Road Over Bridge(ROB) as safety measurec

Sion Road Over Bridge: मुंबईतील वाहतुक कोंडीचा समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. अशावेळी प्रशासनाकडून मेट्रो आणि उड्डाणपुलाचे जाळे आखले जात आहे. वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना पालिकेने व प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यातच मुंबईतील काही ब्रिटिशकालीन पुलांचे बांधकामही हाती घेण्यात येणार आहे. त्यातीलच एक असलेल्या सायन रोड ओव्हर ब्रिजबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून सायन रोड ओव्हर ब्रिज (ROB) वर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 21/22.6.2024 (शुक्रवार/शनिवारच्या मध्यरात्री) पासून जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सायन रोड ओव्हर ब्रिजला असुरक्षित घोषित केले आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ROB वर अवजड वाहनांना प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी 21/22.6.2024 (शुक्रवार/शनिवारच्या मध्यरात्री) पासून ROB च्या दोन्ही बाजूंना उंची मापक प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.  या उंची मापकांना 3.60 मीटरची मंजुरी असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

सीआरने वाहतूक विभागाला रस्ता वापरकर्त्यांसाठी योग्य वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली आहे. सायन आरओबी खराब अवस्थेत असण्यासोबतच सीएसएमटी-कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित 5व्या आणि 6व्या मार्गाचेही उल्लंघन करत आहे आणि म्हणूनच तो मोडून टाकून पुनर्बांधणी करण्यात येणार होती.  24 महिन्यात नवीन पूल बांधून पूर्ण केला जाणार आहे. महापालिका आणि रेल्वे यासाठी एकत्रित खर्च करणार आहेत. सायन रेल्वे पूल ब्रिटिशकालीन आहे. 1992 साली बांधण्यात आला होता. 

पूल पाडल्यानंतर नागरिकांची तारेवरची कसरत 

पूल पाडल्यानंतर मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. तसंच, दोन्ही बाजूकडील वाहनांना मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागणार आहे. हा पूल पाडण्याबाबत कित्येत वर्षांपासून सातत्याने हालचाली होत आहेत. मात्र, स्थानिकानी पूल पाडण्यासाठी मोठा विरोध केला होता. त्यामुळं जुना पूल पाडून नवी पूल बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले होते. 28 मार्चपासून पूल बंद करण्यात येणार होता. मात्र, पुलाच्या पाडकामाची तारीख पुढे ढकलली गेली.