कसिनोच्या फोटोवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण..'मी जेवायला बसलो...'

Chandrashekhar Bawankule Casino Photo: चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 20, 2023, 04:30 PM IST
कसिनोच्या फोटोवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण..'मी जेवायला बसलो...' title=
Photo: चंद्रशेखर बावनकुळे ट्विटर

Chandrashekhar Bawankule Casino Photo: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा एक फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली. त्यानंतर थोड्यावेळातच भाजपा महाराष्ट्रकडून आदित्य ठाकरेंचा फोटो शेअर करण्यात आला.आता चंद्रकांत बावनकुळे यांनी फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'लाव रे तो व्हिडीओ' नाट्य सुरु आहे. एकमेकांचे वादग्रस्त व्हिडीओ, फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली जात आहे. फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो 19 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,वेनेशाइन इथला फोटो असल्याचा दावा संजय राऊतांन केलाय. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात, असे राऊतांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे भाजप महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवरुन आदित्य ठाकरेंचा कथित फोटो शेअर करण्यात आला आहे. 

काय म्हणाले बावनकुळे?

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो. तेथील हा परिसर असल्याचे बावनकुळे म्हणाले. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.