छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...

सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2023, 11:56 AM IST
छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान title=
सोशल मीडिया ( संग्रहित छाया)

Sharad Pawar Retirement Updates : दिल्लीत सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवार असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'झी 24 तास'शी बोलताना केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर दिल्लीची जबाबदारी तर अजित पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रीय अध्यक्षपद जाण्याची चर्चा आहे. तर अजित पवार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होतील अशाही चर्चा रंगत आहे. 

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पवार यांचा हा निर्णय रुचला नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तगादा लावला. अनेकांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. तर पुण्यात साहेब... असे पोस्टर लागले आहे. याचदरम्यान, छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केल्याने अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? राष्ट्रवादीवरही घराणेशाहीचा आरोप होईल, त्याचे काय? आता तसं काही राहिलेले नाही. लोकांना माहिती आहे, त्यामुळे घराणेशाही असं काही नसतं, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, शरद पवार आपल्या निवृत्तीच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पवारांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी रिघ लागलीय. राजीनामा मागे घेण्यास पवार तयार नसल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून झालेल्या मनधरणीनंतरही पवार अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झालेत. नियोजित गाठीभेटींसाठी पवार चव्हाण सेंटरवर आले आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत शरद पवार चव्हाण सेंटरवर असणारेत. याठिकाणी ते लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेणारेत. सुप्रिया सुळे देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची! आणि याचसंदर्भात सध्या दोन नावं पुढे येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची प्राथमिक चर्चा असल्याची माहिती आहे. अध्यक्षपद पुन्हा घेण्यास शरद पवार इच्छुक नसल्याची माहिती याआधीच सूत्रांनी दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांचे दिल्लीत सर्वपक्षीय संबंध आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी कमी करायची तर सुप्रिया सुळेंच्या नावाचा विचार करावा असा मतप्रवाहसुद्धा पक्षात असल्याची माहितीही समजतेय.. तेव्हा नवा अध्यक्ष कोण होणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे.