विधान भवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे

 विधान भवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याने  संताप व्यक्त होत आहे.  

Updated: Jun 20, 2019, 10:46 AM IST
विधान भवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे title=

मुंबई : विधान भवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सहकार विभगातील अधिकारी मनोज लाखे यांना मटकीत चिकणचे तुकडे आढळले. त्यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. संबंधित कंत्राटदार निष्काळजीपणे कॅन्टीन चालवत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले आहे. बुधवारी उसळीमध्ये मटनाचे तुकडे मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मटकी उसळीत चिकनचे तुकडे मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. मनोज लाखे या सरकारी अधिकाऱ्याने याबाबतची तक्रार केली. मंत्रालयाच्या कँटीनमधून मागविण्यात आलेल्या मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याचे लाखे यांनी सांगितले.