मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार मुंबईच्या दिशेने रवाना, गोवा विमानतळावरून विमानाचे टेकऑफ

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार थोड्याच वेळेत मुंबईत पोहोचणार आहेत.

Updated: Jul 2, 2022, 07:34 PM IST
मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार मुंबईच्या दिशेने रवाना, गोवा विमानतळावरून विमानाचे टेकऑफ title=

पणजी : शिवसेना बंडखोर आमदार 11 दिवसानंतर मुंबई मध्ये येत आहेत. भाजपचे नेते प्रसाद लाड विमानतळावर त्यांना घेण्यासाठी दाखल झाले आहेत. गोवा विमानतळावरून विमानाचे टेकऑफ झालं असून 

मुख्यमंत्री आणि सर्व आमदार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रात्री जवळपास 8.20 मिनिटांनी हे विमान मुंबई लँड होणार आहे.

शिवसेनेचे 39 आमदार आणि 10 अपक्ष आमदार आता मुंबईत दाखल होत आहेत. या आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलनं केली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही उपस्थित झाला. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांनी सुरक्षा पुरवली होती.

सर्वोच्च न्यायालयाने देखील आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं म्हटलं होतं, आज हे आमदार मुंबईत दाखल होत असल्याने मुंबई विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोख पोलीस बंदोबस्तात या सर्व आमदारांना हॉटेलपर्यंत आणलं जाणार आहे.