मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडत रविवारी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाली. एकही गिरणीकामगार बेघर ठेवणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गिरणी कामगारांना दिलं. तसंच एकही घर विकू नका असं वचनही त्यांनी गिरणी कामगारांकडे मागितलं. घर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका असं ते यावेळी म्हणाले. तर शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन यावेळी आदित्य ठाकरेंनी दिलं.
पुढील दोन चार वर्षात मुंबईत ५० हजार परवडणारी घर बांधणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखा निर्णय घेण्यास मोकळीक देणारा दुसरा मुख्यमंत्री नाही असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुकही केलं.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या ३८९४ सदनिकांची सोडत जाहीर झाली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यामधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निणर्य आहे. pic.twitter.com/90TNknwcyi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 1, 2020
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान आहे त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगाराला घर कसे मिळेल ते आम्ही पाहुत असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका असे आवाहन त्यांनी केले. pic.twitter.com/yiOxuDY41l
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 1, 2020
म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडत आहे. म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे तसंच पर्यावरण मंत्री उपस्थित होते. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत आहे.