रायगड दौऱ्यासाठी मुख्यमंत्री अलिबागकडे रवाना

आदित्य ठाकरेही सोबत....

Updated: Jun 5, 2020, 11:58 AM IST
रायगड दौऱ्यासाठी मुख्यमंत्री अलिबागकडे रवाना  title=

मुंबई : नुकत्याच रायगड किनारपट्टीवर धडकलेल्या Cyclone Nisarga 'निसर्ग' या चक्रीवादळामुळं सदर परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रभावित  क्षेत्राला भेट देण्यासाठी पावलं उचलली. शुक्रवारी मुंबईतील भाऊचा धक्का येथून उद्धव ठाकरे अलिबाग दिशेनं रवाना झाले. रोरो बोटीतून त्यांनी हा प्रवास सुरु केला. यावेळी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं. 

 

वादळानंतर लगेचच रायगड जिल्ह्याला भेट देण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा आणि त्यातील काही कार्यक्रम निर्धारित आहेत. ज्यामध्ये ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. सोबतच अलिबाग येथील चुंबकीय वेधशाळा भागाचीही पाहणी करतील. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाबातच्या आढाव बैठकीलाही त्यांची उपस्थिती असेल.