ख्रिसमस, न्यू-ईअर पार्टीमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

ख्रिसमस आणि न्यू-ईअरनिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स रात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहेत.

Updated: Dec 24, 2019, 04:12 PM IST
ख्रिसमस, न्यू-ईअर पार्टीमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी title=

मुंबई : २०१९ हे वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता सर्वत्र नववर्षाच्या जंगी स्वागताची तयारी सुरू आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी विविध हॉटेल्स, पब्ज, रेस्तराँ सज्ज झाले आहेत. पण या पर्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी मुंबई हायकोर्टाने यासंबंधीत आदेश दिले आहेत. 

मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'शहरातील हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमध्ये फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी विनापरवाना वाजवता येणार नाहीत. परवाना शुल्क आणि सुरक्षित कॉपीराईट परवानग्या दिल्याशिवाय पार्ट्यांमध्ये गाणी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.'

शिवाय आयोजकांना प्रसिद्ध चित्रपटांमधील गाणी वाजवण्यासाठी परवाना शुल्क भरून ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स’ची (पीपीएल) परवानगी घ्यावी लागणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. 

तर ख्रिसमस आणि न्यू-ईअरनिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स रात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहेत. २४, २५ आणि ३१ डिसेंबरला बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहतील, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले.

परंतु, वेळेच्या या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क आण‌ि पोलिसांनी लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बनावट मद्याच्या पुरवठ्यावरही उत्पादन शुल्क व‌िभागाची नजर राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खासगी पार्ट्यांनासुद्धा स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.