डॉ.पायल तडवी आत्महत्याप्रकरणात डॉ. चिंग लिंग, डॉ. शिरोडकरांना क्लीन चिट

 डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्याप्रकरणातून २ डॉक्टरांना क्लीन चिट

Updated: Dec 29, 2019, 05:04 PM IST
डॉ.पायल तडवी आत्महत्याप्रकरणात डॉ. चिंग लिंग, डॉ. शिरोडकरांना क्लीन चिट title=

मुंबई : नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील निवासी डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्याप्रकरणातून डॉ. चिंग लिंग आणि डॉ. शिरोडकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने डॉ. चिंग लिंग आणि डॉ. शिरोडकर यांना क्लीन चिट दिलीय. पायल तडवीने आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ अर्थातच चिंग लिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, वरिष्ठांनी याप्रकरणाची दखल न घेतल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. 

पायलच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप 3 मुलींसह 2 वरिष्ठ डॉक्टरांवर केला गेला होता. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. यी चिंग लिंग यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर डॉ. शिरोडकर यांना आता क्लीन चिट देण्यात आली आहे. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर पायलच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता.