सर्वसामान्यांना लोकलबाबत लवकरच आणखी दिलासा मिळणार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... 

Updated: Feb 8, 2021, 04:48 PM IST
सर्वसामान्यांना लोकलबाबत लवकरच आणखी दिलासा मिळणार  title=

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... लोकलमधून प्रवास करणं अडचणीचं ठरत असल्याने सामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कदाचित पुढच्या काही दिवसांत लोकलचं नवं टाईमटेबल येऊ शकतं. आणि तुम्हाला दिलासा मिळू शकतो. लोकलबद्दल लवकरच नवा निर्णय होणार आहे.

कोरोना नियंत्रणात राहिल्यास सामान्यांना आणखी सूट ?

१ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सामान्यांसाठी ठराविक वेळांसाठी खुली झाली. सामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यावर कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढण्याचा अंदाज होता..पण मुंबईतली कोरोनासंख्या आटोक्यात आहे. पुढचे काही दिवसही मुंबईतला कोरोना असाच नियंत्रणात राहिला, तर पुढच्या १५ दिवसांत लोकलचं नवं टाईमटेबल जाहीर होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. 

सध्या ठराविक वेळेमध्येच सामान्य मुंबईकरांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे... पण या ठराविक वेळा सामान्य मुंबईकरांसाठी अडचणीच्या ठरत आहे. 

सध्या तिकीटाच्या रांगांमध्ये मुंबईकरांचा बराच वेळ जातोय. त्यामुळे पुढच्या प्रवासातही अडचणी येत आहेत. सध्या मुंबईत रोज चारशे ते पाचशे रुग्ण सापडत आहेत. ही संख्या पुढचे काही दिवस नियंत्रणात राहिली, तर लोकलचं नवं टाईमटेबल येईल आणि सामान्य मुंबईकराला आणखी दिलासा नक्की मिळेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x