खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा सुटला

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा तुर्तास मिटला आहे.

Updated: Jul 31, 2017, 08:39 PM IST
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा सुटला  title=

मुंबई : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा तुर्तास मिटला आहे. खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशाची निवड यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयानं दिलीय.

शिक्षण शुल्क समितीसोबत पुढच्या महिन्यात बैठक घेण्यात आहेत. या बैठकीत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्काबाबत चर्चा करण्यात येणार आहे. शुल्क वाढवण्याची परवानगी न दिल्या कारणानं खासगी महाविद्यालयांनी थेट प्रवेश प्रक्रियाच थांबवण्याची आडमुठी भमिका घेतली होती.