मरिन ड्राईव्हला वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्यावरून वाद

एक हजार चाळीस फ्लॅट्स, ४० इमारती आणि त्यातले रहिवासी यांचं भवितव्य त्यांना न विचारता ठरवण्याचा घाट घातला जातो आहे. मुंबईच्या मरिन ड्राईव्हला याआधीच हेरिटेज प्रिसेंट दर्जा दिला आहे. मात्र आता त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्याचा घाट घातला जातो आहे त्यावरून वाद रंगला आहे.

Updated: Sep 7, 2017, 02:24 PM IST
मरिन ड्राईव्हला वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्यावरून वाद title=

मुंबई : एक हजार चाळीस फ्लॅट्स, ४० इमारती आणि त्यातले रहिवासी यांचं भवितव्य त्यांना न विचारता ठरवण्याचा घाट घातला जातो आहे. मुंबईच्या मरिन ड्राईव्हला याआधीच हेरिटेज प्रिसेंट दर्जा दिला आहे. मात्र आता त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्याचा घाट घातला जातो आहे त्यावरून वाद रंगला आहे.

युनेस्कोची टीम या संदर्भात आठवड्याभरात येणार आहे. मात्र आम्हाला याबाबत विचारात न घेतलं नाही असा आरोप रहिवाशांनी केला आहे. असा दर्जा मिळाल्यास या विभागाच्या विकासाला खीळ बसेल असा आरोप या रहिवाशांनी केला आहे. परिसरातल्या इमारतींच्या पुनर्विकासालाही अडसर निर्माण होईल अशी भीती रहिवाशांना आहे. या भागातल्या बहुतांश इमारती या १९४० ते १९५० च्या काळात बांधल्या आहेत. त्यामुळे येथे वर्ल्ड हेरीटेज दर्जा नको तर पूनर्विकास हवा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.