कोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण

 कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे. 

Updated: Apr 7, 2020, 10:40 AM IST
कोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण title=

मुंबई : कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे.  धारावीच्या डॉ. बालिगानगरमध्ये आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे चिंता वाढली आहे. धारावीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे. बालिगानगरमध्ये दिल्लीतील धार्मिक क्रार्यक्रम मरकजहून आलेल्या काही व्यक्ती राहून गेल्या होत्या त्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात  झाली आहे. याआधी एका डॉक्टरालाही कोरोनाची बाधा झाली होती. तर परवा ३० वर्षीय कोरोना झालेल्या युवतीच्या ८० वर्षीय  वडिलांना आणि ४९ वर्षीय भावालाही कोरोना झाला आहे.

दरम्यान, एकट्या मुंबईत कोरोनाचे नवे ७०  रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२८ वर गेला आहे. तर सोमवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चाललीय.  कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८७२ वर पोहोचलीय. तर मृतांचा आकडा ५२वर गेलाय. गेल्या २४ तासांत राज्यात नवे १२४ रूग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

धारावीमध्ये बाधितांचा आकडा वाढत आसल्यामुळे या कुटुंबाचे घर सील करण्यात आले आहे. तसेच कोणताही धोका नको म्हणून संपूर्ण बलिगा नगरही सील करण्यात आले आहे. बलिगानगरमधील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आता हे दोन नवे रुग्ण आढळल्याने बलिगा नगरमध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन नवे रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, धारावीतील करोना संख्या वाढतच आहे. त्यापैकी बलिगा नगरमध्ये चार, आणि वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर आणि मदिना नगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.