कोरोनाचे संकट : अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी 'एसटी' आणि 'बेस्ट' मदतीसाठी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी  व बेस्ट मदतीला धावली आहे.

Updated: Mar 24, 2020, 05:35 PM IST
कोरोनाचे संकट : अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी 'एसटी' आणि 'बेस्ट' मदतीसाठी title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत .त्यानुसार राज्यभर संचार बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील लोकल सेवा देखील बंद करण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्या  कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने एसटी महामंडळ व बेस्ट प्रशासनाला अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या निर्देशानुसार एसटीने मंत्रांलयीन  कर्मचाऱ्यांची ने - आण करण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण(सकाळी ८:००,८:१५) येथून तसेच पश्‍चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी  बसेसची सोय केली आहे.  

तसेच बेस्टच्यावतीने बोरीवली स्टेशन -मंत्रालय (८:००,८:३०),शासकीय वसाहत बांद्रा- मंत्रालय(८:३०,९:००) पनवेल एसटी स्टँड -मंत्रालय (७:३०,८:३०)ठाणे कॅडबरी जंक्शन- मंत्रालय (८:००,८:३०)डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर- मंत्रालय(८:३०,९:००) विक्रोळी डेपो- मंत्रालय(८:३०,९:००) पि.के.खुराणा चौक वरळी - मंत्रालय(८:४५,९:००) येथून बसेस सुटतील.

याबरोबरच बृहन्मुंबई महापालिका ,शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार,पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल,पालघर,आसनगाव,विरार कल्याण , बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबई तील  बोरिवली,वाशी दादर व ठाणे (खोपट)या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) एसटीच्या  बसेस  दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.  
                       
या बसेस १डोंबिवली-ठाणे,२ पनवेल-दादर,३पालघर-बोरिवली, ४ विरार- बोरिवली,५ टिटवाळा-ठाणे ६आसनगाव- ठाणे, ७ कल्याण- ठाणे,८कल्याण -दादर, ९ बदलापूर -ठाणे १० नालासोपारा- बोरिवली या मार्गावर धावत आहेत. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना  वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी 'बेस्ट' बसेसची सेवा एसटीच्या बसेस ना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे. तरी या सेवेचा संबंधित प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x