कोरोनाचं सावट : यंदा दहीहंडी नाही पण 'जय जवान' गोविंदाने पथकाने जपली बांधिलकी

उपनगरचा राजा 'जय जवान' गोविंदा पथक 

Updated: Jul 14, 2020, 02:21 PM IST
कोरोनाचं सावट : यंदा दहीहंडी नाही पण 'जय जवान' गोविंदाने पथकाने जपली बांधिलकी  title=

मुंबई : कोरोनाचं सावट यंदा सगळ्याचं सणांवर आलं आहे. गुरूपौर्णिमा झाली की, प्रत्येक गोविंदा पथकात रेलचेल असते ती दहीहंडीच्या सरावाची. पण यंदा मात्र हे चित्र पाहायला मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी हा उत्सव साजरा केला जाणार नाही. 'दहीहंडी' हा माणुसकीचं आणि सामाजिक बांधिलकी जपायला शिकवणारा सण आहे. गोविंदा पथक जेव्हा एकावर एक असे थर रचून मानवी मनोरा उभारतो तेव्हा याच गोष्टींच दर्शन त्यामधून होतं. 

जय जवान गोविंदा पथकात ५०० हून अधिक गोविंदा आहेत. या पथकाची सराव तयारी ही जन्माष्टमीच्या दोन महिने अगोदर सुरू होते. यंदा १२ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे. पण यंदा हे पथक दहीहंडी हा उत्सव साजरा करणार नाही.  पण यंदा दहीहंडी हा सण साजरा होत नसला तरी उपनगरचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या 'जय जवान' या गोविंदा पथकाने सामाजिक बांधिलकी जपणाने अनेक उपक्रम या कोरोनाच्या काळात केले आहेत. जय जवान हे गोविंदा पथक कायम सामाजिक उपक्रम राबवत असतात. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार ट्रामा हॉस्पिटलसाठी २०० बॉटल रक्तदान सेवा पथकाकडून करण्यात आली. तसेच २५० ते ३०० गरजूंना मास्क वाटप देखील करण्यात आलं.  जोगेश्वरी, नायगाव ( जूचंद्र ) ,मालाड मढ गाव, वर्सोवा गाव, आरे आदिवासी पाडा येथील गरजूना धान्य वाटप करण्यात आलं. 

एवढंच नव्हे तर चक्रीवादळामुळे अलिबाग चौल गावात खूप झाडे कोलमळून पडली तेथे भेट देऊन साफसफाई आणि धूर फवारणी करण्यात आली. रायगड हिरकणी गावात नुकसान झालेल्या १२२ लोकांना धान्य वाटप आणि जंतुनाशक धुरफावरणी करण्यात आली. जोगेश्वरी विभागात जेथे खुप गरज आहे तेथे रोज जंतुनाशक धुरफावरणी करण्यात येते.

तसेच लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल झाल्यानंतर जोगेश्वरी विभागातील रिक्षा चालकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी रिक्षामध्ये लावण्यात येणाऱ्या प्लास्टिकचे वाटप करण्यात आले. अश्याप्रकारे या वर्षी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेऊन शक्य तेवढी समाज सेवा करत राहण्याचा निर्णय 'जय जवान' गोविंदा पथकाने घेतला असल्याचं प्रशिक्षक संदिप भरत ढवळे सांगतात.