मुंबई : राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८ हजार २३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 14718 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9136 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 531563 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 178234 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.46% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 27, 2020
आज निदान झालेले १४,७१८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात मृत्यू नोंद) : मुंबई मनपा-१३५० (३०), ठाणे- २३८ (१२), ठाणे मनपा-१८३ (१), नवी मुंबई मनपा-४०५ (११), कल्याण डोंबिवली मनपा-२७८, उल्हासनगर मनपा-२१, भिवंडी निजामपूर मनपा-१६ (१), मीरा भाईंदर मनपा-१८९ (६), पालघर-१३० (२), वसई-विरार मनपा-१७६, रायगड-३०५ (१३), पनवेल मनपा-२१४ (७), नाशिक-२१९ (१५), नाशिक मनपा-७४० (१६), मालेगाव मनपा-४६ (१), अहमदनगर-३४७ (४),अहमदनगर मनपा-२५८ (४), धुळे-७२, धुळे मनपा-७८ (१), जळगाव- ६०३ (७), ९जळगाव मनपा-९४ (३), नंदूरबार-१४३ (३), पुणे- ८१९ (१२), पुणे मनपा-१७७२ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-१०८५, सोलापूर-२५१ (१४), सोलापूर मनपा-५६ (४), सातारा-५३२ (२), कोल्हापूर-३५२ (२२), कोल्हापूर मनपा-१५१ (५), सांगली-२४७ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७६ (६), सिंधुदूर्ग-१८, रत्नागिरी-६४, औरंगाबाद-१३५ (१),औरंगाबाद मनपा-११९ (५), जालना-४३ (४), हिंगोली-५९ (१), परभणी-४८, परभणी मनपा-२५, लातूर-८५ (२), लातूर मनपा-१२८ (१), उस्मानाबाद-४९ (४),बीड-५६ (२), नांदेड-१११ (१८), नांदेड मनपा-१८२ (१३), अकोला-४२ (२), अकोला मनपा-१२, अमरावती-४५, अमरावती मनपा-८६ , यवतमाळ-११७ (२), बुलढाणा-६७ (२), वाशिम-२८, नागपूर-१५२ (२), नागपूर मनपा-१०८६ (३४), वर्धा-४१ (३), भंडारा-३९ (४), गोंदिया-६५, चंद्रपूर-७४, चंद्रपूर मनपा-४९, गडचिरोली-२५, इतर राज्य २२ (३).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांपैकी ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.