मुंबई : पीएफ खात्यातील बॅलन्स (PF Balance) तपासण्याचे अनेक पर्याय आहेत. अनेकदा पीएफमधील रक्कम किती आहे हे पाहण्यासाठी ऑनलाईन सर्च करतो. Umnag App किंवा पीएफओच्या वेबसाईटवर जाऊन पीएफ बॅलन्स तपासू शकता. मात्र बॅलन्स चेक करताना जरा सावध रहायला हवं. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला सावध करण्यामागचं कारणही तसंच आहे. (cyber fraud cheated to 1 lakh 23 thousand rupees man who check online pf balance)
एका 47 वर्षाच्या इसमासह सायबर फ्रॉड झाला. या व्यक्तीच्या पीएफ खात्यातून तब्बल 1 लाख 23 हजार रुपये एका झटक्यात उडाले. ही व्यक्ती ईपीएफओच्या कस्टमर केअरचा नंबर ऑनलाईन सर्च करत होता. या दरम्यान नक्की अशी काय चूक झाली ज्यामुळे पीएफ खात्यातून रक्कम उडाली, हे आपण जाणून घेऊयात.
या व्यक्तीने इतरांप्रमाणेच ऑनलाईन कस्टमर केअरचा नंबर सर्च करण्याची चूक केली. मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती ईपीएफओची हेल्पलाईन नंबर शोधत होता. या दरम्यान व्यक्तीला फ्रॉडद्वारे अपलोड केलेला नंबर मिळाला. मात्र हा नंबर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांकडून अपलोड केल्याची काडीमात्र कल्पना या व्यक्तीला नव्हती.
त्या फ्रॉड व्यक्तीने या व्यक्तीला Remote Acess App डाऊनलोड करायला सांगितलं. त्यानुसार या फ्रॉडस्टारने पीएफधारकाच्या खात्यातून 14 ट्रांजेक्शन करुन 1 लाख 23 हजार रुपये ट्रान्सफर केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती मुंबईतील अंधेरीत राहतो. तसेच कामाला एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ही व्यक्ती 7 नोव्हेंबरला पीएफ खात्यातील रक्कम तपासत होती. या पीडित व्यक्तीने मोबाईलवर इपीएफओची वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
यानंतर पीडित व्यक्तीने ऑनलाईन पीएफ कस्टमर केअर नंबर सर्च केला. जो नंबर सापडला त्यावर कॉल केला. समोरच्या फ्रॉड व्यक्तीने या संधीचा चांगलाच फायदा करुन घेतला. पीडित व्यक्तीला एक app डाऊनलोड करायला सांगितला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने पीडित व्यक्तीला ऑनलाईन पेमेंट करायला सांगितलं, जेणेकरुन खात्यातील रक्कम किती आहे हे जाणून घेता येईल. अशा प्रकारे या पीडित व्यक्तीला फ्रॉडस्टरने आपल्या जाळ्यात खेचलं आणि रक्कम लुटली.
अनेक जण इंटरनेटवर हेल्पलाईन नंबर सर्च करतात. मात्र हेल्पलाईन नंबर हे एडिट करता येतात. यामुळे अनेकदा सर्वसामान्य फ्रॉड्सच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरुनच हेल्पलाईन नंबर घ्यायला हवा.