SBI बॅंक दरोडा : पोलिसांनी दोघांना केली अटक

Dahisar SBI Bank robbery : दहिसर येथील SBI बँकेत दिवसाढवळ्या दरोडा (SBI Bank robbery) टाकण्यात आला होता. या दरोड्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  

Updated: Dec 30, 2021, 10:22 AM IST
SBI बॅंक दरोडा : पोलिसांनी दोघांना केली अटक title=
संग्रहित छाया

दहिसर : Dahisar SBI Bank robbery : दहिसर येथील SBI बँकेत दिवसाढवळ्या दरोडा (SBI Bank robbery) टाकण्यात आला होता. या दरोड्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाबारत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. (Dahisar SBI Bank robbery  Two accused arrested)

SBI बॅंकेच्या दहिसर शाखेवर दरोडा (SBI Bank robbery ) टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दरोड्यातील दोन आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. एकाला दहिसरमधून अटक करण्यात यश आले आहे.

दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने दहिसर पश्चिम परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Firing in dahisar state bank ) दरोड्याच्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कर्मचारी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे. गोळीबारात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव संदेश गोमारे असून तो 25 वर्षांचा आहे. 

दरोडेखोरांनी सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झालेत. या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 8 टीम तयार केल्या होत्या. पोलिसांनी दहिसर येथून एकाला आरोपीला अटक केली आहे.