Devendra Fadnavis | पेनड्राईव्ह कुठून आला? देवेंद्र फडणवीसांनी दिला हा जबाब

Devendra Fadnavis Pendrive enquiry | पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराची गोपनीय माहिती लीक झाल्याच्या चौकशीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीय.  

Updated: Mar 17, 2022, 09:38 AM IST
Devendra Fadnavis | पेनड्राईव्ह कुठून आला? देवेंद्र फडणवीसांनी दिला हा जबाब  title=

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराची गोपनीय माहिती लीक झाल्याच्या चौकशीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीय. आपल्याला पेनड्राइव्ह कोणी पाठवला हे मला माहीत नाही, पोस्टानं एका पत्रातून पेनड्राईव्ह ऑफिसला आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात आली. पोलीस बदल्यांच्या आरोपात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पैशाच्या बदल्यात प्लम पोस्टिंगसाठी आयपीएस अधिकाऱ्यांकडून जोरदार लॉबिंग केल्याचा आरोप केल्यानंतर, गेल्या मार्चमध्ये मुंबई पोलिसांनी अधिकृत गुप्त कायद्यांतर्गतअज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. 

मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे काळे कारनामे बाहेर काढत राहणार : देवेंद्र फडणवीस

'मला पोलिसांनी प्रश्नवली पाठवली होती. मी त्यांना उत्तर देईन असं सांगितलं होतं. परंतू पोलिसांनी मला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. सभागृहात मी सरकारला अडचणीत आणणारे घोटाळे आणि षडयंत्र बाहेर काढत असल्यामुळे अशाप्रकारच्या नोटिसा मला पाठवण्यात आल्या. पोलिसांनी माझी घरीच चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

मला जे प्रश्न पाठवले ते प्रश्न आणि विचारण्यात आलेले प्रश्न यात गुणात्मक फरक होता. मी शासकीय गोपनियेतेचे उल्लंघन केले असा पोलिसांचा रोख होता. तुम्ही सरकारी गोपनियतेचा भंग केला असं तुम्हाला वाटत नाही का असे मला विचारण्यात आले.' असे फडणवीसांनी म्हटले.

'मी जबाबदार नागरिकासारखं ते संवेदनशील पुरावे योग्य व्यासपीठाकडे दिले आहेत. परंतू ही चौकशी नवाब मलिकांची व्हायला हवी. ज्यांनी महाघोटाळा केला त्यांची व्हायला हवी. मीच आरोपी आहे असं पोलीस प्रश्न विचारत होते. मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही. मी सरकारचे काळे कारनामे बाहेर काढत राहिल.' असा इशारा फडणवीस यांनी सरकारला दिला होता.