'ही राजकारणातील #MeTooची पहिली केस'

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) प्रकरणावरुन आता राजकारणातील #MeTooची पहिली केस असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Jan 16, 2021, 07:26 PM IST
'ही राजकारणातील #MeTooची पहिली केस'

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप होण्यामागे नेमकं काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पैसा किंवा संपत्तीच्या वादातून हे प्रकरण चव्हाट्यावर आलेलं नाही. तर मुंडेंचा राजकीय वारसदार कोण? या वादातून हे महाभारत घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याचवेळी ही राजकारणातील #MeTooची पहिली केस असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत आणि मी त्यांना ओळखत नाही. हे प्रकरण खूप गंभीर आहे. बॉलीवूडमध्ये जसे `Me Too´ होते, तसेच राजकारणातील ही पहिली `Me Too´ची केस आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या प्रकरणाचे गांभीर्य समजले आहे. हे आता थांबवायला हव. रेणू शर्मा माझा आदर करते म्हणते, पण तीनं लांब राहूनच आदर व्यक्त करावा, असे भाजपचे नेते कृष्णा हेगडे ( Krishna Hegde) यांनी म्हटले आहे. तर मनसेचे मनीष धुरी यांनीही रेणू शर्मावर (Renu Sharma ) आरोप केला आहे. तर तर विमान कंपनीत काम करणाऱ्या रिझवान कुरेशी यांनीही तिच्याविरोधात याआधी तक्रार दाखल केली आहे.

यावरून आतापासूनच संघर्ष पेटला आहे आणि त्याचीच धग धनंजय मुंडे यांना बसली आहे. मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या बहिणीने म्हणजे रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप केले आहेत. पैशांसाठी हे ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा दावा स्वतः मुंडे यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आरोपांबाबतचा तपास आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करा असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिलेत. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी या संदर्भात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार नाही असं राष्ट्रवादीने याआधीच स्पष्ट केले आहे.